मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट, जलाशयांत १८ टक्केच पाणी

पालिकेच्या पाणी खात्याकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची ओरड आहे.मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा,भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयातून दर दिवशी ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. गुरूवार पर्यंत या सात जलाशयात २ लाख ६३ हजार ६३१ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक होते.

    मुंबई – गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांच्या काहिली होत आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयातील पाणी साठा कमी होत चालला असून काही दिवस पाउस पडला नाहीतर मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती व्यकत होत केली जात आहे. जलाशयांत केवळ १८ टककेच पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी टंचाईची मुंबईकरांना भीती आहे.

    पालिकेच्या पाणी खात्याकडून गेल्या दोन तीन दिवसांपासून पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याची ओरड आहे.मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा,भातसा, विहार आणि तुळशी या ७ जलाशयातून दर दिवशी ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येतो. गुरूवार पर्यंत या सात जलाशयात २ लाख ६३ हजार ६३१ दशलक्ष लिटर पाणी शिल्लक होते.

    म्हणजेच १८.४४ टकके पाणी शिल्लक राहिले आहे. हा पाणी साठा पुढील ६८ दिवस म्हणजेच १४ सप्टेंबर २०२१ पर्यंत पुरेल इतकाच आहे.पावसाने अशीच दडी मारली तर पाण्याची पातळी आणखी खाली जाईल आणि मुंबईकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो अशी भीती व्यकत होत जात आहे. येत्या काही दिवसांत जोरदार पाउस पडला तर पाणी संकट टळू शकते.आता काय करतो याकडे अनेकांचे डोळे लागले आहेत.