Crisis on farmers, possibility of torrential rains in the next 3 days in the state, 'Yellow' alert issued nrsj

राज्यात पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, कोकणात रिमझिम पावासासह गारपीट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई : कोरोनाचे संकट अजूनही घोंगावत असताना शेतकऱ्यांवर (Farmers) आस्मानी संकट आलं आहे. आधी कोरोनाचे संकट आणि नंतर मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान (Crisis on farmers) झाले आहे. आता कुठे त्या परिस्थितीतून शेतकरी सावरतोय तर पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभं ठाकलं आहे. काही दिवसांपासून उत्तर भारतात तुफान गारा आणि पाऊस पडत आहे. त्याचपार्श्वभूमीवर राज्यात देखील हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई, कोकणात रिमझिम पावासासह गारपीट होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रासह उत्तर भारतात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

राज्यात कुलाबा वेधशाळेकडून १९ जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, यवतमाळ, वाशीम, वर्धा, अकोला, नागपूर, बुलडाणा, अमरावती, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. ऐन थंडीत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.