मदर्स रेसिपीच्या वतीने तीन नवीन चवींचे कुरकुरीत पापड-वडाम लाँच; मधल्या वेळेत भूक भागविण्यासाठी उत्तम पर्याय

सध्या भारतात कोविड-१९चा कहर सुरू असताना सर्वांना जबरदस्तीने घरीच बसून ठेवले आहे. घराबाहेर जाण्याची मुभा नसल्याने बाहेरील पदार्थांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत घरगुती पदार्थांना मोठी मागणी दिसते. ग्राहकांच्या मागणीनुसार मदर्स रेसिपीने तीन कुरकुरीत चविष्ट पापड-वडाम हिरवी मिरची, लाल मिरची आणि कांदा अशा हलक्या तिखट स्वादात पर्याय बाजारात आणले आहेत.

  मुंबई : मधल्या वेळेतील खाऊची बाजारपेठ मोठ्या वेगाने वाढते आहे. मागील दशकात हा ट्रेंड चढत्या क्रमाने असल्याचे पाहायला मिळाले. रेडी-टू-फ्राय या खाऊच्या प्रकारची बाजारपेठ रुपये २०००कोटींची आहे. यामध्ये कार्यरत असणारे निर्माते मोठ्या प्रमाणावर असंघटीत क्षेत्रातील आहेत, तसेच काही संघटीत क्षेत्रातील देखील आहेत. वडामला भारतात (फ्रायम) म्हणून ओळखले जाते. भारतीय आहारात तळणीच्या पदार्थाची खास जागा असते.

  सध्या भारतात कोविड-१९चा कहर सुरू असताना सर्वांना जबरदस्तीने घरीच बसून ठेवले आहे. घराबाहेर जाण्याची मुभा नसल्याने बाहेरील पदार्थांचा आस्वाद घेणे कठीण झाले आहे. अशा स्थितीत घरगुती पदार्थांना मोठी मागणी दिसते. ग्राहकांच्या मागणीनुसार मदर्स रेसिपीने तीन कुरकुरीत चविष्ट पापड-वडाम हिरवी मिरची, लाल मिरची आणि कांदा अशा हलक्या तिखट स्वादात पर्याय बाजारात आणले आहेत.

   

  मदर्स रेसिपी हा भारतातील अग्रगण्य फूड ब्रँड्सपैकी एक असून आपल्या ग्राहकांना अधिक वैविध्य उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी तीन अतिशय कुरकुरीत स्वादिष्ट क्रिस्पी पापड (वडाम) सादर केले आहेत. हे वेगवेगळ्या स्वादांमधील क्रिस्पी पापड-वडाम चांगल्या पद्धतीने भूक भागवतात. हे पापड विविध मसाले आणि चिरलेल्या भाज्यांसोबत खाऊ शकतो. वाढत्या मागणीसोबत हे क्रिस्पी पापड-वडाम आता देशभर उपलब्ध आहेत. आपल्या घरगुती जेवणासोबत जिभेचे चोचले पुरवणाऱ्या एखाद्या पदार्थाची जागा हे उत्पादन घेईल. संपूर्ण कुटुंबासोबत संध्याकाळच्या चहासोबतचा खाऊ म्हणूनही मजा घेता येईल. घरातील मुलांनादेखील ही चव आवडेल. भुकेच्या वेळी खाल्या जाणाऱ्या चिप्सऐवजी घरी बनवलेला नाश्त्याचा पदार्थ म्हणूनही या उत्पादनाला पसंती मिळणार आहे. मदर्स रेसिपी क्रिस्पी पापडमध्ये सर्वोत्तम गुणवत्तेचे तांदूळ पीठ, गव्हाचा कोंडा आणि दर्जेदार मसाले वापरले जातात. अगदी पारंपरिक पद्धतीने हे उत्पादन तयार केले जाते आणि त्यात कोणतेही प्रीझर्व्हेटीव्ह वापरण्यात आलेले नाही.

  अलीकडच्या लाँचविषयी बोलताना मदर्स रेसिपी – देसाई फुड्सच्या कार्यकारी संचालिका संजना देसाई म्हणाल्या की, “आमच्यावर मदर्स रेसिपीमध्ये ग्राहकांप्रति तसेच सध्याच्या बाजाराच्या मागणीला प्रतिसाद देताना मोठी जबाबदारी असते. एक कंपनी म्हणून आम्ही भारतीय मूल्य आणि संस्कृतीला मोठा मान देतो. त्यामुळे आमची उत्पादने तयार करताना अस्सलता राखण्यासोबत सर्वोत्तम साहित्य आणि पारंपरीक चव देण्याकडे आमचा कल असतो. सध्या देशात महासाथीचे तांडव सुरू आहे. आम्ही डोक्यात सुरक्षेचा विचार ठेवून क्रिस्पी पापड (वडाम)ची नवीन चव अत्यंत स्वच्छतापूर्वक पॅक होत असल्याची खातरजमा केली आहे.”

  सध्या लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम जीवनपद्धतीत ग्राहक वर्गाकडून रेडी टू इट नाश्त्याला वाढती मागणी आहे. आता ही उत्पादने मुंबई, पुणे, बंगळूरू, दिल्ली एनसीआर, चेन्नई आणि हैदराबाद येथे उपलब्ध आहेत आणि लवकरच अन्य शहरांत लाँच करण्यात येतील.

  सर्व उत्पादने www.mothersrecipe.com वर ऑनलाईन उपलब्ध आहेत.