गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

गणेशोत्सवाची(Ganeshotsav 2021) लगबग सुरु झाली आहे. या सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या(Decoration For Ganpati) सामानापासून ते मोदक, लाडवांच्या प्रसादासह अगरबत्ती, धूप आदींच्या वस्तूंनी मुंबईतील (Mumbai)दादर, भायखळा, क्राफर्डमार्केट आदी मुख्य बाजार(Crowd In Market For Ganpati Festival Shopping) फुलून गेले आहेत.

  मुंबई: काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची(Ganeshotsav 2021) लगबग सुरु झाली आहे. या सणासाठी लागणाऱ्या सजावटीच्या(Decoration For Ganpati) सामानापासून ते मोदक, लाडवांच्या प्रसादासह अगरबत्ती, धूप आदींच्या वस्तूंनी मुंबईतील (Mumbai)दादर, भायखळा, क्राफर्डमार्केट आदी मुख्य बाजार(Crowd In Market For Ganpati Festival Shopping) फुलून गेले आहेत. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दादर, क्रॉफर्ड मार्केट, भायखळा आदी बाजारात लोकांनी गर्दी केली हाेती. गणेशोत्सवाला चार दिवस राहिल्याने सोमवारीही बाजारात गर्दी झाली होती. विक्रेते व ग्राहकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचे दिसून आले.

  राज्य सरकारने निर्बंधांत शिथिलता दिल्याने सार्वजिनक ठिकाणी गर्दी वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांनंतर गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. कोरोनाचा धोका कायम असल्याने राज्य सरकारने गणशोत्सवा दरम्या्न कोरोनाचे नियम पाळा, गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. मात्र बाजारात छोट्या – मोठ्या दुकानदारांची दुकाने गणेशोत्सवासाठी सजली आहेत. त्यामुळे लोकांचीही खरेदीसाठी गर्दी वाढते आहे.

  खरेदीसाठी गर्दी
  दादरसह मालाड, बोरीवली, भांडुप, घाटकोपर, विलेपार्ले, मुलुंड आदींसह प्रमुख भागांत फेरीवाल्यांनी आपल्या व्यवसायाशेजारी गणेशोत्सवासाठी अगरबत्ती धूप, कापडी फुले व त्यांची तोरणे, लाडू, मोदक, फुटाणे, टाळ, निरंजन, समई तसेच सजवाटीसाठी आवश्यक असणारे आकर्षक कपडे, पडदे, विजेचे दिवे, तोरण आदींचे स्टॉल्स लावले आहेत. दादरमधील जावळे मार्गावरील पदपथ या गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या प्रत्येक वस्तूंच्या सामानांच्या स्टॉल्सनी खुलून गेले आहेत. तर डिसिल्व्हा रोड कपडे आणि फळांनी, तर स्टेशनपासून ते रानडे मार्ग आणि छबिलदास गल्ली तर आकर्षक फुलांनी आणि कंठ्या, हार आणि फुलांच्या लडी तसेच मखरांनी बहरुन गेले आहेत.

  सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
  बाजारात गर्दी करताना सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अनेक ग्राहक व विक्रेतेही मास्क व कोरोनाचे नियम पाळताना दिसत नाहीत. अनेक फेरीवाले, व्यापारी यांच्याकडूनही कोरोनाचे नियम धाब्यावर धरले जात असल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची भिती व्यक्त केली जाते आहे.