Rebellion in graduate elections; Pankaja Munde supporters also filed nomination papers

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर पंकजा यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    मुंबई : नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी वरळी कार्यालयात घेतलेल्या मेळाव्यातील गर्दीमुळे भाजपा नेत्या पंकजा मुंडेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पंकजांना नोटीस बजावण्यात आली आहे.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रितम मुंडे (Pritam munde) यांना स्थान न दिल्याने मुंडे समर्थक नाराज झाले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यासह राज्यभरात ७० हून अधिक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. यानंतर पंकजा यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

    वरळी येथे पंकजा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या कार्यक्रमता कोरोनाच्या नियमांना हरताळ फासण्यात आला.