ग्राहकांनी मीटर रीडिंग स्वतः पाठवावे; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतांचे निर्देश

राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वीज ग्राहकांनी आपले मीटर रीडिंग स्वत: पाठवावे आणि थकित वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हटले आहे. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मंत्रालयात वीज बिलाच्या थकबाकी संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

    मुंबई : राज्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता वीज ग्राहकांनी आपले मीटर रीडिंग स्वत: पाठवावे आणि थकित वीजबिल भरुन महावितरणला सहकार्य करावे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत म्हटले आहे. राऊत यांनी वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यास सांगितले आहे. मंगळवारी ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी मंत्रालयात वीज बिलाच्या थकबाकी संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.

    बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना उद्देशून ऊर्जामंत्री म्हणाले की, ग्राहकांना ऑनलाईन आणि मोबाईल अ‍ॅपद्वारे तक्रारी देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु ज्या ग्राहकांना त्याचा उपयोग करता येणार नाही त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवर तक्रारी नोंदवण्याची व्यवस्था उपलब्ध करावी.

    कोरोनाकाळात अनेक ग्राहकांनी मीटर रिडिंग न घेताच बिल पाठविल्याबद्दल तक्रार केली आहे. त्यामुळे शक्य तितके मीटर रीडिंगद्वारे बिल पाठवा. कोरोनामुळे बर्‍याच वेळा रिडिंग घेणे शक्य नाही, अशा वेळी जर ग्राहक त्यांच्या मोबाइल फोन अॅपवरून मीटर रीडिंग पाठवित असतील तर त्यानुसार बिल पाठवले जाईल. या बैठकीला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.