इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची कट ऑफ लिस्ट जाहिर

  इयत्ता अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आज (शनिवारी) जाहीर झाली. मुंबईत नामांकित कॉलेज दुसऱ्या गुणवत्ता यादीनंतर सुद्धा कट ऑफ नव्वदी पार झाल्याचं दिसून आलंय. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत नामांकित कॉलेजच्या कट ऑफ जवळपास 1 टक्यांनी घसरला (4 ते 7 गुणांनी कमी).

  मुंबई विभागात 60,037 विद्यार्थ्यांना दुसऱ्या गुणवत्ता यादीत कॉलेज प्राप्त झाले आहे. दुसऱ्या गुणवत्ता यादीत मुंबई विभागात 13,282 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळाले आहे. सायन्स 5125, कॉमर्स 37186, आर्टस् 17333 शाखेसाठी  विद्यार्थ्यांना दुसऱ्या यादीत कॉलेज मिळाले आहेत.

  या यादीत नाव आलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेण्यासाठी 6 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि अमरावती महापालिका क्षेत्रात अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या एकूण 2 लाख 57 हजार 447 जागा रिक्त असून या जागांसाठी दुसऱया गुणवत्ता यादीत 1 लाख 96 हजार 518 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते.

  पहिल्या गुणवत्ता यादीत पहिल्या पसंतीचे कॉलेज नाकारलेल्या 10 हजार 751 विद्यार्थ्यांना या यादीत प्रकेशाची संधी दिली जाणार नाही.

  विभागनिहाय आलेले प्रवेशअर्ज, उपलब्ध जागा

  विभाग रिक्त जागा प्रवेशअर्ज
  पुणे 63682 35694
  नाशिक 13270 9837
  नागपूर 32765 12867
  अमरावती 7936 4397
  मुंबई 139794 133723