यंदा दहीहंडीचे थर लागणार की नाहीत? आज मुख्यमंत्री घेणार निर्णय

राज्यातील विरोधी पक्ष भाजपने व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे शहर परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करणारच अशी आधीच घोषणा केली आहे.

    महाराष्ट्रात विशेषत: गणपतीनंतर लोकांच्या आवडीचा व आनंदाचा सण म्हणजे हदीकाला. कोरोनाच्या आधी म्हणजे 2019 मधे मुंबईत दहीहंडी म्हणजे एक मोठा इव्हेट होता. डीजेच्या तालावर अख्खी मुंबई नाचायची. या एका दिवसांत मुंबईत गोविंदा पथकांच्या बक्षीसांची रक्कम, सेलिब्रीटींचे मानधन हे सर्व पकडून करोडोंची उलाढाल व्हायची. मात्र, कोरोना आला या सर्व गोष्टी आता एक फक्त आठवण बनल्या आहेत.

    कोरोनाच्या सावटामुळे मागील वर्षी दहीहंडीला परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र, यावर्षी तरी सरकार दहीकाल्याला परवानगी देणार का? असा प्रश्न सर्वासमोर आहे. याच संदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत बैठक बोलावली आहे. या प्रतिनिधींशी चर्चाकरुन मुख्यमंत्री निर्णय घेणार असल्याचं सांगीतलं जात आहे.

    दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्यावर कोरोनाचं सावट कायम असल्येने यावर्षी देखील राज्य सरकार गोविंदा पथकांना दहीकाल्याची परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. त्यामुळे, राज्यातील विरोधी पक्ष भाजपने व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई आणि ठाणे शहर परिसरात दहीहंडी उत्सव साजरा करणारच अशी आधीच घोषणा केली आहे.

    त्यामुळे आता सरकार काय निर्णय घेणावर यावर सर्वाचं लक्ष आहे.