बोरिवलीच्या ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाच्या नुकसानीची केली पाहणी; महापालिकेने तातडीने उपाययोजना करुन दिलासा द्यावा

गेल्या दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली पूर्व परिसर जलमय झाला आहे. श्रीकृष्णनगर परिसरात तब्बल पाच ते सात फुट पाणी जमा झाले आहे. या पाण्याचा फटका हायवेवरील ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाला बसला आहे. यापूर्वी दोन-तीन वर्षांपूर्वी प्रचंड पावासामुळे या ग्रंथालयामध्ये पाणी शिरले व पुस्तकांचे अतोनात नुकसान झाले होते.

  • विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिले निर्देश

मुंबई : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पावसामुळे बोरिवली पूर्वेतील श्रीकृष्णनगर परिसरातील ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाचे अपरिमित नुकसान झाले. या ग्रंथालयात ४ ते ५ फूट पाणी साचल्याने येथील ग्रंथसंपदा पाण्यात भिजून खराब झाली. या ग्रंथालयाला दरेकर यांनी आज तातडीने भेट देऊन पाहणी केली आणि ग्रंथालयाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

येथील जवळजवळ ८ हजार पुस्तकांचे नुकसान झाले आहे. २०१७ साली पावसात असेच ग्रंथालयाचे नुकसान झाले होते. दरेकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुन्हा असा फटका ग्रंथालयाला बसू नये यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

गेल्या दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरिवली पूर्व परिसर जलमय झाला आहे. श्रीकृष्णनगर परिसरात तब्बल पाच ते सात फुट पाणी जमा झाले आहे. या पाण्याचा फटका हायवेवरील ज्ञानेश्वरी मराठी ग्रंथालयाला बसला आहे. यापूर्वी दोन-तीन वर्षांपूर्वी प्रचंड पावासामुळे या ग्रंथालयामध्ये पाणी शिरले व पुस्तकांचे अतोनात नुकसान झाले होते.

कालच्या पावसाचा फटका पुन्हा या ग्रंथालयाला बसला आहे. विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आज ग्रंथालयाची पाहणी करताना भविष्यात या परिसरात पाणी जमू नये व पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पध्दतीने करण्याचे निर्देश उपस्थित मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले.

Damage to Dnyaneshwari Marathi Library in Borivali Municipal Corporation should take immediate measures to provide relief says pravin darekar