मुसळधार पावसामुळे मिठी नदीनं ओलांडली धोक्याची पातळी, नदीचे पाणी रस्त्यावरुन थेट वस्तीत ; घरांमध्ये शिरले गुडघाभर पाणी

दरवर्षी पाऊस सुरू झाला की, या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी रस्त्यावरुन थेट वस्तीत शिरले आहे.

    मुंबईः काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे नदीचे पाणी काठोकाठ भरल्यानं वस्तीत पाणी शिरले आहे. कुर्ला पश्चिमेकडील क्रांतीनगर ही वस्ती बैलबाजार व जरीमरी परिसरात आहे. परंतु बैलबाजार व जरीमरी हे भाग मिठी नदीपेक्षा उंचीवर व तुलनेने दूर आहेत.

    क्रांतीनगर वस्ती खोलगट भागात असून नदीच्या तीरावरच आहे. यामुळे दरवर्षी पाऊस सुरू झाला की, या वस्तीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. तशीच स्थिती सध्या निर्माण झाली आहे. रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळं मिठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचे पाणी रस्त्यावरुन थेट वस्तीत शिरले आहे.

     रस्त्यावर नदीचे पाणी आल्यानं नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. नदीशेजारील क्रांतीनगर भागातून नागरिकांच्या स्थलांतराला सुरुवात झाली आहे.