‘शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका’, कंगणानं व्यक्त केली भीती

बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिवसेनेचं आणि कंगणाचं वैर तसं जुनच आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा कंगणाने शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हणत कोर्टात याचिका दाखल केली आहे. सध्या कंगणावर सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिच्यावर खटले सुरू केले आहेत.

    मुंबई (Mumbai).  बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. शिवसेनेचं आणि कंगणाचं वैर तसं जुनच आहे. मात्र अशातच पुन्हा एकदा कंगणाने शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं म्हणत कोर्टात याचिका दाखल केली आहे. सध्या कंगणावर सोशल मीडियावर केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे तिच्यावर खटले सुरू केले आहेत.

    कंगणा आणि तिची बहीण रंगोेलीवर जे खटले सुरू आहेत ते खटले मुंबई-महाराष्ट्रातून हिमाचल प्रदेशला हलवण्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आपल्याला शिवसेना नेत्यांकडून माझ्या जीवाला धोका आहे. जर मुंबईत या खटल्याची सुनावणी झाली तर भडास काढण्यासाठी शिवसेनेचे नेते टोकाची पावलं उचलू शकतात, असं कंगणाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने वकील नीरज शेखर यांच्याद्वारे सुप्रीम कोर्टात स्थानांतरण याचिका दाखल केली आहे.

    कंगणाने दोन महिन्यांपुर्वी कृषी कायद्यावरून काही आक्षेपार्ह ट्विट केले होते. शेतकरी आंदोलनावर जो टीका करेल त्याच्यावर कंगणा ट्विटच्या माध्यामातून टीका करत होती. मध्यंतरी कंगणावर कर्नाटकातही एफआयआर दाखल करण्यात आला होता. कंगनाने कर्नाटक हायकोर्टात याचिका दाखल करुन एफआयआर रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र कंगणानाला त्यावेळी नकार कळवण्यात आला होता.

    दरम्यान, कंगणाविरोधात वकील अली कासिफ खान यांनी कंगनाविरोधात एक खटला दाखल केला आहे. तर दुसरा खटला गीतकार जावेद अख्तर यांचा मानहानीचा आहे. तिसऱ्या खटल्यामध्ये कास्टिंग डायरेक्टर मुनव्वर अली सय्यद यांनी कंगना आणि रंगोलीविरोधात खटला दाखल केला आहे.