NCB LOGO

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला एक मोठा झटका बसला. अंमली पदार्थ विरोधी पक्षाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई करत दाऊदचा जवळचा हस्तक असलेल्या आरिफला बेड्या ठोकल्या. एनसीबीने मोहम्मद आरिफ याच्या मुसक्या आवळल्या आहे. एनसीबीची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

    मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला एक मोठा झटका बसला. अंमली पदार्थ विरोधी पक्षाने (एनसीबी) मुंबईत मोठी कारवाई करत दाऊदचा जवळचा हस्तक असलेल्या आरिफला बेड्या ठोकल्या. एनसीबीने मोहम्मद आरिफ याच्या मुसक्या आवळल्या आहे. एनसीबीची ही एक मोठी कारवाई मानली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक आहे. अंमली पदार्थ तस्करीत त्याचा मोठा सहभाग असायचा. लहान मुलांच्या मार्फत आरिफ अंमली पदार्थांची तस्करी करत असे. या प्रकरणात एनसीबीने त्याला मुंबईतून अटक केली आहे.

    अटक करण्यात आली त्यावेळी एनसीबीने त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत साधारणत: 10 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. आरिफ मोहम्मद हा चिंकू पठाण प्रकरणात फरार होता.