मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील महिलेचा विचित्र पद्धतीने मृत्यू ?

मुंबई: मुंबईतील राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील एक ४० वर्षीय महिला कर्मचारी रुग्णालयातील लिफ्टमध्ये विचित्र पद्धतीने अडकल्याने आज तिचा मॄत्यू झाल्याचे समोर आली आहे. यामुळे

 मुंबई: मुंबईतील राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील एक ४० वर्षीय महिला कर्मचारी रुग्णालयातील लिफ्टमध्ये  विचित्र पद्धतीने अडकल्याने आज तिचा मॄत्यू  झाल्याचे समोर आली आहे. यामुळे रुग्णालयात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिक पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर काही दिवसांपासून उपचार सुरु आहेत, त्यामुळे या रुग्णालयातील साफसफाईसाठी सफाई कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत. याच रुग्णालयातील गीता वाघेला ही महिला बुधवारी नेहमीप्रमाणे साफसफाई करत असताना लिफ्टची साफ सफाई करण्यास गेली. त्यावेळी लिफ्टमध्ये तिचे केस अडकले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचे लिफ्टमध्ये केस अडकले आणि केसांखालील त्वचेसकट ते ओढले गेले. त्यानंतर तिचा मृत्यू झाला. याबाबत, सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधिक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले की, ही  महिला रुग्णालयात साफ सफाईचे काम करत होती. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आजुबाजुला कोणीही नव्हते. बऱ्याच वेळाने एका कर्मचाऱ्याने पाहिले आणि आम्हाला कळविले. महिलेच्या शव विच्छेदनानंतर खुलासा होईल की, तिची तब्येत ठीक नव्हती का? तिला त्यावेळेला चक्कर आली होती का? की अन्य काही कारण आहे? याबाबत पोलीस ही तपास करत आहेत.