विजेच्या धक्याने  तरुणाचा मृत्यू; विद्युत लाईन दुरूस्तीचे काम सुरू असताना घडला अपघात

मानवली परिसरात विद्युत लाईन दुरूस्तीचे काम सुरू होते. दरम्यान अज्ञाताने डी ओ मारल्याने विघुत पुरववठा सुरू झाल्याने हा अपघात घडला. अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविणार असुन कंत्राटी कामगार मुशीर खान यांच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई बाबत अहवाल पाठवणार आहे - महावितरण उपअभियंता दुवे

कल्याण: टिटवाळ्यानजीक मानवली परिसरातील शनिवारी रात्री विद्युत लाईनचे काम सुरू असताना खंडीत केलेला विद्युत पुरवठा सुरू झाल्याने एका कंत्राटी कामगाराचा शाँक लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याने बल्याणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास मानवली परिसरातील विद्युत लाईनचे दुरुस्ती काम सुरू होते. या साठी त्यापरिसरातील टान्सफार्मरचा डीओ ओपन करण्यात आला होता. विद्युत लाईनचा वीज पुरवठा खंडित केला होता. दरम्यान रात्री १२. वा.१७मि.च्या अंधारात विद्युत लाईनचे काम सुरु असताना विद्युत पुरवठा सुरू झाल्याने लाईन दुरुस्तीचे काम करीत असलेला २८ वर्षीय मुशीर खान राहणार बल्याणी शाँक् लागल्याने मुत्यु पडल्याची झाल्याची दुर्दैवी घटना घडली. “या प्रकरणी महावितरणचे उपअभियंता दुवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री मानवली परिसरात विद्युत लाईन दुरूस्तीचे काम सुरू होते. दरम्यान अज्ञाताने डी ओ मारल्याने विघुत पुरववठा सुरू झाल्याने हा अपघात घडला असवा. या निष्कर्ष पर्यंत आम्ही गेलो असल्याने अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदविणार असुन कंत्राटी कामगार मुशीर खान यांच्या कुटुंबीयांना महावितरण कडून नुकसान भरपाई बाबत अहवाल पाठवणार आहे.” गेली दोन दिवसापूर्वी विद्युत लाईन तटुन इंदिरा नगर परिसरातील घरावर पडल्याची घटना घडते सुदैवाने यांत जिवित हानी झाली नाही आणि आता मानवली परिसरात विद्युत लाईन तुटल्याने दुरुस्ती सुरू असताना एकाचा मुत्यु होतो. हे टिटवाळा महावितरणच्या भोंगळ कारभाराने घडते यामध्ये कधी सुधारणा होणार असा सवाल यानिमित्ताने नागरिक करीत आहेत.