yawatmal corona death

राज्यात आज ६२  करोना(corona) बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  शनिवारी राज्यात ५,७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,७४,४५५ झाली आहे.

मुंबई : राज्यात आज ६२  करोना(corona) बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  शनिवारी राज्यात ५,७६० नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १७,७४,४५५ झाली आहे.

आज ४,०८८ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १६,४७,००४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ९२.८२%एवढे झाले आहे. तर राज्यात आज रोजी एकूण ७९,८७३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मंडळ निहाय मृत्यू संख्येत ठाणे मंडळ १७, नाशिक मंडळ ७, पुणे मंडळ३१,  अकोला मंडळ ७,  इतर राज्यात असे ६२ मृत्यू  झाले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. तसेच आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०१,२०,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,७४,४५५ (१७.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात ५,२२,८१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आणि ४,५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.