प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देशातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. याला बहुसंख्य कामगार संघटनांनीही पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. बंदमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार आहे. एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होतील.

मुंबई (Mumbai). देशातील शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. याला बहुसंख्य कामगार संघटनांनीही पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. बंदमध्ये नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट देखील सहभागी होणार आहे. एपीएमसीमधील भाजी, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट एक दिवस बंद राहणार आहे. सोबतत माथाडी कामगार देखील या बंदमध्ये सहभागी होतील.


एपीएमसी दाणा मार्केट आणि मसाला मार्केट बंद राहणार का याबाबत उद्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. एपीएमसी संचालक शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एपीएमसीतील तीन मार्केट राहणार बंद राहणार आहेत. शेतकरी कायद्या विरोधात अनेक शेतकऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली होती. त्यामुळे आता एपीएमसीदेखील बंद राहणार आहे.

नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये आतापर्यंत अनेकदा बैठका झाल्या आहेत. पण त्यातून कोणताही तोडगा निघालेला नाही. आता ९ डिसेंबरला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शेतकरी संघटना कायदा रद्द करण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण केंद्र सरकार कायदा रद्द करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. विरोधी पक्ष देखील यातून केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीने या बंदला पाठिंबा दर्शवला आहे.