नववी आणि अकरावीच्या परीक्षेबाबत आज फैसला, शिक्षण विभागाची महत्त्वाची बैठक

नववी आणि अकरावीच्या परीक्षा होणार की रद्द होणार की ऑनलाईन पद्धतीने होणार, याचा फैसला आज (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण मंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित परीक्षेचं वेळापत्रक पाळून विद्यार्थ्याना आणखी काही दिलासा येतो का, याचीही चाचपणी केली जाणार आहे. 

    फेब्रुवारी महिन्यापासून राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. सध्या तरी देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून महाराष्ट्र त्यात अव्वल आहे. देशात आढळणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांपैकी सुमारे ५० टक्के रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रात असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं पहिली ते आठवीच्या वार्षिक परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता नववी आणि अकरावीच्या परीक्षांचं काय होणार, याकडं सर्वांचं लक्ष आहे.

    नववी आणि अकरावीच्या परीक्षा होणार की रद्द होणार की ऑनलाईन पद्धतीने होणार, याचा फैसला आज (मंगळवारी) होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आज शिक्षण मंडळाची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत नववी आणि अकरावीच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे दहावी आणि बारावीच्या पूर्वनियोजित परीक्षेचं वेळापत्रक पाळून विद्यार्थ्याना आणखी काही दिलासा येतो का, याचीही चाचपणी केली जाणार आहे.

    देशातील अनेक राज्यांनी अगोदर विद्यार्थ्यांच्या शालेय परीक्षा रद्द करून त्यांना पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय घेतलाय. महाराष्ट्राने तीनच दिवसांपूर्वी पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. कोरोनामुळे राज्यातील शाळा आणि महाविद्यालये बंद असल्यामुळे परीक्षा घ्यायच्या तरी कशा, असा प्रश्न सर्वांसमोर आहे.

    दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थी आणि पालक करत होते. मात्र ते शक्य नसल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकाप्रमाणे आणि ऑफलाईनच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.