दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात दोन दिवसात निर्णय

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं अधिक संक्रमित होत असल्याचे दिसून येते आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुध्दा भीती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.

    मुंबई:- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भातील संभ्रम अजून कायम आहे. सीबीएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसंदर्भात आज बैठक पार पडली. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. विद्यार्थीचं आरोग्य ही आमची प्राथमिकता असेल आणि त्यानुसारच परिक्षा संदर्भातील निर्णय लवकरच घेतला जाईल अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलं अधिक संक्रमित होत असल्याचे दिसून येते आहे. तसेच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुध्दा भीती आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलं संक्रमित होण्याचा धोका अधिक आहे.

    या सगळ्याचा विचार करून आणि विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी दोन दिवसात बैठक घेऊन परिक्षा संदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाईल. असे शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांनी स्पष्ट केले.