The renaming of schools after cities and airports; All Mumbai Municipal Corporation schools will be renamed

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवला जातो. त्याचधर्तीवर महापालिकेच्या शाळांमध्येही महिन्यातून दोन दिवस ‘दप्तराविना शाळा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या शाळेतील महिन्यातील कोणतेही दोन शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहे. या दिवशी अभ्यासक्रमाऐजवी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.

  मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचा बोजा हा विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. त्यामुळे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवला जातो. त्याचधर्तीवर महापालिकेच्या शाळांमध्येही महिन्यातून दोन दिवस ‘दप्तराविना शाळा’ उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या शाळेतील महिन्यातील कोणतेही दोन शनिवारी दप्तराविना शाळा भरणार आहे. या दिवशी अभ्यासक्रमाऐजवी विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.

  बदलत्या शैक्षणिक धोरणांची अमलबजावणी व नवीन अभ्यासक्रमांची सांगड घालताना विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे वाढतच आहे. हे ओझे कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. यातीलच जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये राबवण्यात येत असलेल्या आठवड्यातून एक दिवस ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकांच्या शाळेमध्येही महिन्यातून दोन दिवस ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवण्यात यावा, अशी सूचना शिवसेना शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी गतवर्षी मांडली होती.

  शनिवारी अर्धा दिवस शाळा असल्याने बहुतांश विद्यार्थी शाळेत येण्यास टाळाटाळ करतात. शनिवारी विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवल्यास तसेच शाळेत खेळायला मिळते हे कळण्यास विद्यार्थी शाळेत येऊन त्यांच्या उपस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गळती थाबवता येईल व अध्यापनाबरोबरच अन्य विषयांमध्येही विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करता येईल, हे लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी या उपक्रमाला नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे यापुढे आता मुंबई महपालिकेच्या सर्व शाळांमध्ये महिन्यातील कोणत्याही दोन शनिवारी ‘दप्तराविना शाळा’ भरणार आहे. या उपक्रमात काही कृतीतून पालकांचा सहभागही वाढवण्यात येणार आहे.

  ‘दप्तराविना शाळे’त विद्यार्थी काय शिकतील?
  ‘दप्तराविना शाळा’ उपक्रमात शैक्षणिक अभ्यासाऐवजी गीत, गायन, वादन, प्रश्नमंजुषा कार्यक्रम, मुकाभिनय, शाब्दिक खेळ, शब्दकोडी सोडवरे, संवाद लेखन, कथाकथन, गोष्टी सांगणे, नाटिका, लेखन, अनुभवकथन, निबंधलेखन, प्रसंग वर्णन, मी पाहिलेली यात्रा, बाजार, सण इत्यादी विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याचे गुण दाखवण्याची संधी मिळेल. या उपक्रमांतर्गत विद्यार्थी आपल्या विविध कालागुणांचे प्रदर्शन करू शकतील.

  ‘दप्तराविना शाळा’ या दिवशी विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव देणारे उपक्रम, त्यांच्या भावविश्वाशी समर्पक गोष्टी त्यांच्याकडून करून घेतल्यास त्यांचा आठवडाभराचा शारीरिक व मानसिक थकवा निघून जाण्यास मदत होईल व पुढील आठवड्यातील अध्ययनासाठी विद्यार्थी नव्या जोमाने सज्ज होतील.

  - साईनाथ दुर्गे, सदस्य, शिक्षण समिती