अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज निर्णय; सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी

राज्याचे माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक गुन्हा नोंदविण्या विरोधात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी 22 जुलै रोजी निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका करत सीबीआय विरोधात जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने, कायदेशीर तरतुदींचे पालन न करता कारवाई केल्याचा दावा केला आहे. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली.

    मुंबई : राज्याचे माजी ग्रुहमंत्री अनील देशमुख यांनी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्राथमिक गुन्हा नोंदविण्या विरोधात केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी 22 जुलै रोजी निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केल्याप्रकरणी सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. त्या विरोधात देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका करत सीबीआय विरोधात जाणीवपूर्वक, राजकीय हेतूने, कायदेशीर तरतुदींचे पालन न करता कारवाई केल्याचा दावा केला आहे. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर याबाबत सुनावणी झाली.

    या प्रकरणी राज्य सरकारने देखील या एफआयआरमधील दोन परिच्छेद वगळण्यासाठी याचिका केली आहे. सीबीआय पोलीस बदल्या आणि फोन टॅपिंग प्रकरणाच्या निमित्ताने सरकारच्या कामकाजात हस्तक्षेप करत आहे असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. सीबीआयने दोन्ही आरोपांचे खंडन केले असून तपास करण्याचा अधिकार आहे असे म्हटले आहे. सीबीआयने या प्रकरणात सर्व संबंधितांचा तपास करायला हवा, केवळ देशमुख यांचीच चौकशी करु नये, आणि निलंबित पोलीस सचिन वाझेला नियुक्त करणा-या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबाबतही प्रश्न उपस्थित केले होते.