स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी; एअर इंडियाकडून मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय

एअर इंडियाकडून देशातील 10 शहरांमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या माध्यमातून एअर इंडियाला 200 ते 250 कोटी रुपये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार 13.3 लाखांपासून या मालमत्तांचा लिलाव सुरु होईल.

    मुंबई:  एअर इंडियाने आपल्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून कंपनीला झालेला तोटा भरून काढणे शक्य होणार आहे. त्यासाठी एअर इंडिया मुंबई आणि दिल्लीतील काही अलिशान मालमत्तांचा लिलाव करणार आहे. येत्या 8 आणि 9 जुलैला ऑनलाईन पद्धतीने ही लिलाव प्रक्रिया पार पडेल.

    एअर इंडियाकडून देशातील 10 शहरांमधील मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे. या माध्यमातून एअर इंडियाला 200 ते 250 कोटी रुपये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. मनी कंट्रोलच्या माहितीनुसार 13.3 लाखांपासून या मालमत्तांचा लिलाव सुरु होईल.

    एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत एक रहिवासी प्लॉट आणि एका फ्लॅटची विक्री केली जाणार आहे. तर दिल्लीतील पाच फ्लॅट लिलावासाठी उपलब्ध असतील. बंगुळुरूत एक प्लॉट आणि कोलकातामध्ये 4 फ्लॅट लिलावात विकले जातील. याशिवाय औरंगाबाद येथे एक बुकिंग कार्यालय, स्टाफ क्वार्टर, नाशिकमध्ये सहा फ्लॅट, नागपूरमध्ये एक बुकिंग ऑफिस, भुजमध्ये एअरलाईन हाऊस आणि प्लॉट, तिरुवनंतपुरमध्ये एक प्लॉट आणि मंगळुरूत दोन फ्लॅटसचा लिलाव केला जाईल.