मुंबईच्या जीवनवाहिनीत प्रवाशी संख्येची घट, केवळ पास धारकांनाच प्रवास

पश्चिम रेल्वेवर २१ जून रोजी प्रवासी संख्या ही १३ लाख होती. त्यानंतर जुलैच्या सुरूवातीला ९ लाखांवर आली. तर, त्यानंतर २४ जुलै रोजी प्रवाशांची संख्या ६ लाख ७५ हजार होती. पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या ७४० जणांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाखांची दंड वसूली केली. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात एकूण ३,२०८ बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे.

    मुंबई –  मुंबईची जीवनवाहिनी (लाईफलाईन) म्हणजे मुंबईची लोकल ट्रेन. मुंबईकरांसाठी लोकल म्हणजे प्रवासासाठी वरदानच आहे, असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. पालघर, विरार, कल्याण, डोबिंवली, अंबरनाथ, पनवेल, नवी मुंबई आदी भागातून दररोज लाखो लोक ह्या लोकलने प्रवास करतात. येथून लाखो लोक मुंबईत नोकरीकरिता ये-जा करतात. पंरतू हिच मुंबईची लाईफलाईन कोरोनामुळं मागील काही महिन्यापासून सामान्याकरिता बंद ठेवण्यात आली होती.

    पण अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे स्थानकात ओळखपत्र दाखवून पास आणि तिकिट मिळते. त्याद्वारे लोकलमधून प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र, काही प्रवासी बनावट ओळखपत्र तयार करून लोकलमधून प्रवास करताना आढळून आले. या प्रवाशांना पकडण्यासाठी कडक कारवाई केली जात आहे. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड वसुल करण्यात आला.

    परंतू मागील महिन्यापासून कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर मुंबईची लोकल ट्रेन पुन्हा एकदा सुरु करण्यात आली. त्याला लोकांनी चांगला प्रतिसाद सुद्धा दिला आहे. परंतू आता तिसरी लाट आणि कोरोना काळात प्रवासी संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. कोरोनापूर्वी दररोज ८० लाख प्रवासी लोकलनं प्रवास करत होते.

    मात्र आता या संख्येत घट होऊन ही संख्या ३० लाखांवर आली आहे. सध्या कोरोना लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना रेल्वेनं प्रवास करता येत आहे. त्यातच केवळ पासधारकांनाच प्रवास करता येतोय. आता लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या ५ लाख प्रवाशांनी मासिक पास काढल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.

    पश्चिम रेल्वेवर २१ जून रोजी प्रवासी संख्या ही १३ लाख होती. त्यानंतर जुलैच्या सुरूवातीला ९ लाखांवर आली. तर, त्यानंतर २४ जुलै रोजी प्रवाशांची संख्या ६ लाख ७५ हजार होती. पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्या ७४० जणांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाखांची दंड वसूली केली. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून महिन्यात एकूण ३,२०८ बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करणाऱ्यांना पकडण्यात आले आहे. यांच्याकडून १६ लाखांची दंड वसूली केली.

    ऑगस्ट महिन्याच्या आकडेवारीनुसार, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लसीकरण झालेले केवळ पाच टक्के प्रवाशांनी लोकलचा मासिक पास काढला आहे. समोर आलेली ही आकडेवारी ११ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीतील आहे. मध्य रेल्वेवर १९ लाख तर पश्चिम रेल्वेर ११ लाख प्रवासी दररोज प्रवास करत आहेत. यावरुन स्पष्ट होते की, रेल्वेच्या दोन्ही मार्गावर प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते.

    राज्य शासनाने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना १५ ऑगस्टपासून लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात येईल अशी घोषणा केली होती. तसेच लशीचा दुसरा डोस घेऊन १४ दिवस झाले असतील तरच लोकलने प्रवास करता येईल असं सुद्धा शासनाच्या नियमावलीत म्हटले होते. यासाठी मोबाइल अॅपच्या माध्यमातून प्रवासी रेल्वेचा पास डाऊनलोड करावा, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतात.

    आणि मग ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रवास करता येवू शकतो. किंवा लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यूआरकोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. रेल्वेच्या काही किचकट नियमावलीला कंटाळून सुद्धा काही प्रवाशांनी रेल्वेकडे पाठ फिरवल्याचे समजते. रेल्वे प्रवासी संख्येत मोठी घट आल्याने, त्याचा परिणाम रेल्वेच्या महसूल आणि रेल्वेच्या तिजोरीवर पडणार एवढे मात्र नक्की…