कोरोना रुग्ण संख्येबरोबर होम क्वारंटाईन रुग्ण संख्येत घट; २२ दिवसांत अडीच लाख रुग्ण होम क्वारंटाईनमुक्त

गेल्या वर्षभरापासून कोरोना विरोधातील लढ्याला यश येते आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असल्याने होम क्वारंटाईनमुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. २८ एप्रिलला होम क्वारंटाईन रुग्ण संख्या ६ लाख २७ हजार ७३६ वर पोहोचली होती. मात्र २२ दिवसांत होम क्वारंटाईन रुग्ण संख्येत २ लाख ६ हजार ११६ ने घट होत १८ मेपर्यंत ४ लाख २१ हजार ६२० कोरोना बाधित रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे पालिकेच्या आकडेवारी वरुन समोर आले आहे.

    मुंबई : गेल्या वर्षभरापासून कोरोना विरोधातील लढ्याला यश येते आहे. रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असल्याने होम क्वारंटाईनमुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. २८ एप्रिलला होम क्वारंटाईन रुग्ण संख्या ६ लाख २७ हजार ७३६ वर पोहोचली होती. मात्र २२ दिवसांत होम क्वारंटाईन रुग्ण संख्येत २ लाख ६ हजार ११६ ने घट होत १८ मेपर्यंत ४ लाख २१ हजार ६२० कोरोना बाधित रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचे पालिकेच्या आकडेवारी वरुन समोर आले आहे.

    मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला तेव्हापासून पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोना विरोधात लढा देत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यश मिळवण्यात यश येत असतानाच फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबईत कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोनाने कहर केला. रोजची रुग्ण संख्या ११ हजारांच्या घरात पोहोचली होती.

    वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या यंत्रणेवर ताण आला. परंतु मुंबईकरांची साथ व योग्य उपचार पद्धती यामुळे कोरोनाची दुसरी लाट रोखण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे ११ हजारांच्या घरात आढळणारे रुग्ण तीन महिन्यांत प्रथमच १ हजारांच्या घरात आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. रुग्ण संख्या आटोक्यात येत असल्याने होम क्वारंटाईन रुग्ण संख्येत झपाट्याने घट होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.