deepika and sara

ड्रग्ड कनेक्शनप्रकरणी (drugs  connection ) दीपिका पदुकोण (Deepika Padukon)  , सारा अली खान Sara khan) , श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि रकुल प्रितीसींग (Rakul Preetisingh) यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीकडून (NCB)  या चारही अभिनेत्रींना समन्स जारी केले असून दीपिकाला उद्या शुक्रवारी तर सारा आणि श्रद्धा या दोघींना शनिवारी पाचारण करण्यात आले आहे

मुंबई : बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी (drugs  connection ) दीपिका पदुकोण (Deepika Padukon)  , सारा अली खान Sara khan) , श्रद्धा कपूर (shraddha kapoor) आणि रकुल प्रितीसींग (Rakul Preetisingh) यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. एनसीबीकडून (NCB)  या चारही अभिनेत्रींना समन्स जारी केले असून दीपिकाला उद्या शुक्रवारी तर सारा आणि श्रद्धा या दोघींना शनिवारी पाचारण करण्यात आले आहे. तर आज गुरूवारी रकुल प्रितीसिंह आणि सिमोन खंबाटा यांची चौकशी केली जाणार आहे.

टॅलेंट मॅनेजर जयाकडे  (Jaya Saha) एनसीबी सलग गेले तीन दिवस सखोल चौकशी करीत आहे. क्वान कंपनीच्या दहा भागीदारांपैकी एक असलेल्या जयाचे मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट तपासून तिच्याकडे ड्रग्जबाबत चौकशी सुरू आहे. तिने श्रद्धा कपूरसाठी भारतात प्रतिबंधित ‘सीबीडी ऑइल’ची ऑनलाइन तजवीज केल्याची कबुली दिली. याशिवाय रिया चक्रवर्ती, सुशांत, चित्रपट निर्माता मधू मांटेना, स्वत:साठीही सीबीडी ऑइल मागविले होते. मात्र आतापर्यंत कोणत्याही ड्रज तस्कराशी संपर्क केला नसल्याचे तिने म्हटले.

सुशांतसिंग याच्या समवेत केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या सारा अली खान ही शूटिंग दरम्यान गांजा घेत होती. अशी माहिती अभिनेत्री रिया चक्रवर्तीने दिली आहे. तसेच जया साहाने श्रद्धा कपूर आणि सीबीडी ऑईल घेत असल्याचा जबाब दिला आहे. तसेच रकुलप्रीत सिंह, सिमोन खंबाटा यांच्या सहभागाबाबत पुरावे मिळाले असून, या सर्वांची सविस्तर चौकशी केली जाणार आहे.