dipika padukon in nbc office

मीडियाला हुलकावणी देत दीपिका एनसीबी कार्यालयात पोहचली. मध्य रात्रीचं दीपिका तिच्या घरातून अज्ञात स्थळी गेली होती. तेथूनच ती एनसीबी कार्यालयात पोहचली आहे. दीपिका एकटीच चौकशीसाठी हजर झाली आहे.

मुंबई. ड्रग्स चॅट प्रकरणी एनसीबीकडून अनेक बॉलिवूड कलाकारांना समन्स बजावण्यात आला आहे. यामध्ये दीपिका पदुकोणचाही संबंध आढळल्याने तिलाही नोटीस बजाविण्यात आली होती. दरम्यान आज दीपिका (Deepika’s)  एनसीबी कार्यालयात पोहचली असून सध्या एनसीबीचे अधिकारी तिची चौकशी (interrogation) करीत आहेत.

मीडियाला हुलकावणी देत दीपिका एनसीबी कार्यालयात पोहचली. मध्य रात्रीचं दीपिका तिच्या घरातून अज्ञात स्थळी गेली होती. तेथूनच ती एनसीबी कार्यालयात पोहचली आहे. दीपिका एकटीच चौकशीसाठी हजर झाली आहे.

शुक्रवारी दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची चौकशी करण्यात आली होती. यावेळी करिश्माने त्या व्हाट्सऍप ग्रुप प्रकरणी एनसीबीला माहिती दिली आहे. जया शाह, करिश्मा आणि दीपिका या ग्रुपमध्ये फक्त तीन जणांचा समावेश होता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ग्रुपची ऍडमीन दीपिका होती. या ग्रुपमध्ये मुख्यतः ड्रग्सवरून चॅट होत असे, अससेही तिने सांगितल्याची माहिती आहे.  व्हायरल झालेल्या चॅटमध्ये २०१७ साली दीपिकाने  हशिश नावाच्या ड्रग्सची मागणी केल्याची कबुली देखील करिश्माने दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.