पवईत हनुमान टेकडी परिसरात घराच्या छतातून घरात पडले हरीण

मुंबई: पवई येथील हनुमान टेकडी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतातून एक हरण घरात पडल्याची घटना घडली आहे. हनुमान टेकडी परिसरात रहाणाऱ्या सविता सिंग यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. सिंग

मुंबई: पवई येथील हनुमान टेकडी परिसरात काल मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छतातून एक हरण घरात पडल्याची घटना घडली आहे. हनुमान टेकडी परिसरात रहाणाऱ्या सविता सिंग यांच्या घरात हा प्रकार घडला आहे. सिंग यांच्या घरातील सदस्य गाढ झोपेत असताना अचानक हे हरण घराच्या छतावरून पडल्याने त्यांची तारांबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पॉज-मुंबई ए.सी.एफ. चे स्वयंसेवक हसमुख मारुती वळंजू घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती वनविभागाला देण्यात आली. वनविभागाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. हरणाला वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणीमित्र संघटनेचे स्वयंसेवकांनी पकडले व पुढील वैद्यकीय तपासणीसाठी व उपचारासाठी नेण्यात आले.