अजित पवार, उपमुख्यमंत्री,  महाराष्ट्र राज्य
अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भाजपने विशेष कामगिरी केली नाही. भाजपच्या गडालाच खिंडार पाडल्याने पराभव झोंबला असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांना सणसणीत टोला लगावला आहे.

पुण्यात चंद्रकात पाटील प्रतिनिधीत्व करत होते. पण, आमचा उमेदवार पहिल्या फेरीतच निवडून आला. तीच गोष्ट औरंगाबाद, सतिश चव्हाण तिथे प्रचंड मतांनी निवडून आले. धुळे-नंदुरबारची जागा अमरिश पटेल यांना भाजपने तिथे घेतल्याने आली. अमरावतीला चुकले, पण एक समाधान आहे तिथे भाजपचा आला नाही. शिक्षक आणि पदवीधर हा हुशार वर्ग, याच वर्गाने प्रचंड ताकदीने निवडून दिले असे अजित पवार म्हणाले.

तीन पक्षांचे सरकार आल्याने हातातोंडाचा घास गेला. त्याचे त्यांना दुःख झाले. यानंतर हे सरकार सहा महिन्यात जाईल असेही ते म्हणत होते. पण, सरकार काही गेले नाही. वर्षात सरकार जाईल म्हणाले, पण तरीही गेले नाही. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत दावे करत होते आमच्या पाच जागा येतील सत्ताधार्‍यांची एक येईल.

पण, निकाल वेगळे लागले. नागपूरची जागा तर किती वर्षांनी पराभूत झाले. पदवीधरच्या लोकांनी पराभव केला ते खूप झोंबले आहे. नागपूरमध्ये पराभव झाल्याने एका गटाला खूप उकळ्या फुटत आहेत, असे म्हणत अजित पवार यांनी भाजपमधल्या कथित गटबाजीवर टोलेबाजी केली.