लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापणा पूजेस विलंब, मुंबई पोलिसांच्या अती सुरक्षेमुळे स्थानिक रहिवासी त्रस्त…

लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भावीक लालबागमध्ये येणार नाही आहेत. मग स्थानिक रहिवाश्यांची दुकानं का बंद करण्यात आलीत. असा प्रश्नं लालबाग मार्केट मधील रहिवाशी विचारत आहेत.

    मुंबई पोलिस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात गेली ३० मीनटं चर्चा सुरू. लालबागच्या राजाची स्थापना करणारे स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज.

    लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भावीक लालबागमध्ये येणार नाही आहेत. मग स्थानिक रहिवाश्यांची दुकानं का बंद करण्यात आलीत. असा प्रश्नं लालबाग मार्केट मधील रहिवाशी विचारत आहेत.

    मुंबई पोलिसांच्या अती सुरक्षा कारणास्तव लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी त्रस्तं आहेत. त्यांना त्यांच्याच घरी येण्या जाण्यासाठी पोलिसांकडून अटकाव करण्यात येतोय. त्यामुळे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानेही स्थानिक रहिवाशांच्या मागणीवर ठाम रहात पोलिसांशी मागण्यांवर चर्चा सूरू केलीय. त्यामुळे लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठापनेस विलंब होतोय.