Dadra Nagar Haveli MP Mohan Sanjibhai Delkar's suicide note names Gujarat officials and former ministers

प्रफुल खेडाभाई पटेल यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केलीय, ते सर्वात मोठे आरोपी आहेत. पोलिस तपासात मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणारी अनेक नावे समोर येतील, गेल्या दीड वर्षापासून माझ्या वडिलांना त्रास दिला जात होता, त्यांचा मानसिक छळ केला जात होता, त्यानंतर वडिलांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. प्रफुल पटेल हे भाजपाचे माजी आमदार होते, मंत्री होते, माझे वडील अपक्ष कसे निवडून येतात याचा त्यांना राग होता, त्यामुळे माझ्या वडिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप त्यांनी केला.

    मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. डेलकर यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात भाजपाचे माजी मंत्री प्रफुल्ल खेडाभाई पटेल यांचे नाव आहे. यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राकाँ या सत्ताधारी पक्ष आणि भाजपामध्ये चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, डेलकर यांचा मुलगा अभिनव यांनी, आपल्या वडिलांनी प्रफुल पटेल यांच्यामुळेच मुंबईत आत्महत्या केली, असा पुनरुच्चार केला आहे.

    प्रफुल खेडाभाई पटेल यांच्यामुळेच माझ्या वडिलांनी आत्महत्या केलीय, ते सर्वात मोठे आरोपी आहेत. पोलिस तपासात मोहन डेलकर यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणारी अनेक नावे समोर येतील, गेल्या दीड वर्षापासून माझ्या वडिलांना त्रास दिला जात होता, त्यांचा मानसिक छळ केला जात होता, त्यानंतर वडिलांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. प्रफुल पटेल हे भाजपाचे माजी आमदार होते, मंत्री होते, माझे वडील अपक्ष कसे निवडून येतात याचा त्यांना राग होता, त्यामुळे माझ्या वडिलांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले, असा आरोप त्यांनी केला.

    महाराष्ट्र सरकारवर विश्वास

    माझ्या वडिलांनी महाराष्ट्रात जाऊन आत्महत्या केली, कारण तेथील सरकारवर विश्वास नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर त्यांचा विश्वास होता. मुंबईत आत्महत्या केल्यास निष्पक्ष चौकशी होईल, असे वडिलांनी लिहिले होते. भाजपाशासित राज्यात सत्य समोर आले नसते म्हणून त्यांनी मुंबईत आत्महत्या केली. मीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, शरद पवार-अजित पवारांची भेट घेतली. आमचा ठाकरे सरकारवर पूर्ण विश्वास आहे. डेलकरांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना न्याय देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहे, सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. नेमके या आत्महत्येचे कारण काय हे समोर यायला हवे, अशी मागणही अभिनव डेलकर यांनी केली आहे.