चिंता वाढली – मुंबईत डेल्टा प्लसचा होतोय वेगाने फैलाव, पालिकेने केले ‘हे’ आवाहन

राज्यासह मुंबईतही डेल्टा प्लसचे रुग्ण(Delta Plus Patients In Mumbai) आढळत आहेत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि त्रास झाल्यास संबंधित व्यक्तीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाने(BMC) केले आहे.

    मुंबई: कोविड-१९ (Covid -19)विषाणूच्या डेल्टा प्लसचा(Delta Plus Spread In Mumbai) वेगाने फैलाव होताना पाहायला मिळत आहे. राज्यासह मुंबईतही डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास आणि त्रास झाल्यास संबंधित व्यक्तीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई पालिका प्रशासनाने(BMC) केले आहे.

    संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर तसेच निर्बंधांमध्ये देण्यात आलेली शिथिलतेमुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. दरम्यान यामुळे कोरोना चाचणी संदर्भात पुन्हा एकदा प्रशासनाकडून सक्त अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले आहेत.मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे २५० ठिकाणी विनामूल्य आरटीपीसीआर आणि अ‍ॅन्टीजेन चाचणी उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये महानगरपालिकेचे दवाखाने, प्रसूतिगृह, विभाग कार्यालये तसेच कोविड केंद्र या सर्वांचा समावेश आहे.या चाचणी केंद्रांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विभाग नियंत्रण कक्षांमध्ये देखील तपशिल उपलब्ध आहे. त्याआधारे आपल्या घरानजीकचे विनामूल्य कोविड चाचणी केंद्र आणि त्यांची वेळ इत्यादी माहिती नागरिक प्राप्त करू शकतात.

    या रुग्णांना जास्त काळजीची गरज
    ज्येष्ठ नागरिक, फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार, यकृत विकार, मूत्राशयाचे आजार,मधुमेह, मेंदूरविकार, रक्तदाब, प्रसूतीकाळ नजीक आलेल्या गर्भवती माता, डायलिसिस रुग्ण, कर्करुग्ण, यांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.