नारायण राणेंच्या अटकेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी; अनिल परब कारवाईत हस्तक्षेप करत असल्याचा आरोप

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली.

  मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेचं संपूर्ण प्रकरण संशयास्पद आहे. अनिल परब हे कारवाईत हस्तक्षेप करत होते. निवाडा होण्याआधीच परबांनी निकाल जाहीर केला. राणेंना झालेली अटक बेकायदेशीर आहे. हे संपूर्ण प्रकरण संशयास्पद असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार आशीष शेलार यांनी केली.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने अडचणीत सापडलेल्या राणे यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून तूर्तास दिलासा मिळाला आहे. मात्र, याचिकेत फक्त नाशिक येथील गुन्ह्यांचा समावेश असल्याने यासंदर्भात पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नसल्याची हमी सरकारने दिली.

  राणे यांच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन नाशिकचा गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्या याचिकेवर न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एन. जे जमादार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी तातडीने सुनावणी पार पडली.
  याचिकाकर्त्यांना महाड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक होऊन जामीनही मिळाला असल्याने या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी वेळ देण्यात यावा, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने अ‍ॅड. अमित देसाई यांनी केली. तसेच राणे यांनी पुढील सुनावणीपर्यत राज्य सरकारविरोधात कोणतेही आक्षेपार्ह विधान करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.

  मात्र, त्यास राणे यांनी साफ नकार दिला. तेव्हा, राणे यांच्याविरोधात तूर्तास कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी हमी देताना पुढील सुनावणीपर्यंत राणे यांना अन्य पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात चौकशीस हजर राण्याची आवश्यकता नसल्याचे राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आले. मात्र, राणेंनी जामीनाच्या अटीशर्ती पूर्ण करणे बंधनकारक असेल असेही स्पष्ट केले त्याची दखल घेत खंडपीठाने याचिकेची सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

  read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]