कंत्राटी बस चालकांनाही विमा कवचाची मागणी, कंत्राटी चालकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार

करोना कालावधीतील सेवा असूनही विमा कवच आणि करोना भत्ताही मिळत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. राज्य सरकार आणि पालिकेने करोना कालावधीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रु. भत्ता आणि ५० लाख रु. विमा कवच दिले होते.

    मुंबई – बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसताफ्यातील कंत्राटी चालकांना करोना कालावधीत सेवा देऊनही विमा कवचाचे संरक्षण देण्यात आलेले नाही. तसेच करोना भत्ताही देण्यात येत नाही. त्यामुळे कंत्राटी बसचालकांना विमा कवच आणि करोना भत्ता देण्याची मागणी संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने मुंबई पालिकेकडे केली आहे.

    बेस्टच्या ताफ्यात एक हजारपेक्षा जास्त बस भाडेतत्त्वावर असून त्यात कंपनीतर्फे चालक आणि बेस्टचा कंडक्टर असतो. त्यातील कंत्राटी चालकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार वारंवार केली जाते. त्यात निश्चित केलेल्या पगारापेक्षा पेक्षा कमी पगार, पगार वेळेत न मिळणे, ज्यादा काम करावे लागत असल्याच्या तक्रारी करत कंत्राटी कामगारांनी आंदोलनही पुकारले होते. त्यावेळी संबंधित कंपनीने हा प्रश्न सोडवावा, अशी सूचनाही बेस्टने केली.

    त्याचवेळी, करोना कालावधीतील सेवा असूनही विमा कवच आणि करोना भत्ताही मिळत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. राज्य सरकार आणि पालिकेने करोना कालावधीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रु. भत्ता आणि ५० लाख रु. विमा कवच दिले होते.

    मात्र, त्या सुविधेचा फायदा कंत्राटी कामगारांना देण्यात आला नसल्याचे युनियनने म्हटले आहे. त्यामुळे बेस्टने कंत्राटी बस चालकांसह देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या कामगारांना मार्च २०२० पासून सर्व भत्ता देण्यात यावा. तसेच सध्या करोनाची दुसरी लाट असल्याने सर्व कामगारांना करोना भत्ता देण्यात यावा, अशी मागणी युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी के ली आ