लसटंचाईत सामान्यांचा मनस्ताप वाढविणारी मनसेची मागणी: लसीकरण पूर्ण झाले असेल तरच लोकल प्रवासाची परवानगी द्या !

एकीकडे लसींचा तुटवडा असल्याने (shortage of vaccines) लसीकरण बंद पडले आहे (vaccination has been stopped) तर दुसरीकडे टाळेबंदी उठवण्याची तयारी सुरू झाली आहे (preparations are underway to lift the ban)  मुंबईकराना आता मोकळेपणाने लोकल ट्रेनमधून प्रवास कधी करता येईल याची प्रतिक्षा असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्टिट करत विचित्र अट घालण्याची मागणी केली आहे.

  मुंबई (Mumbai).  एकीकडे लसींचा तुटवडा असल्याने (shortage of vaccines) लसीकरण बंद पडले आहे (vaccination has been stopped) तर दुसरीकडे टाळेबंदी उठवण्याची तयारी सुरू झाली आहे (preparations are underway to lift the ban)  मुंबईकराना आता मोकळेपणाने लोकल ट्रेनमधून प्रवास कधी करता येईल याची प्रतिक्षा असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्टिट करत विचित्र अट घालण्याची मागणी केली आहे. ‘ज्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्यांनाच लोकलने प्रवास (to travel by local) करण्याची परवानगी दिली गेली पाहिजे,  अशी मागणी मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे (MNS general secretary Sandeep Deshpande) यानी व्टिट करत केली आहे.
   
  सर्वांसाठी लोकल सेवा नाहीच
  सध्या मुंबईत  रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. उपनगरांतहीही वाढ थांबली आहे. त्यामुळे मुंबईत टाळेबंदी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचे संकेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मात्र लोकल सेवा सुरू केल्यास गर्दी वाढल्याने  विपरित परिणाम होणार असल्याची शक्यता असल्याने सर्वांसाठी लोकल सेवा देता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  सध्या कार्यालये गाठण्यासाठी मोठा मनस्ताप
  त्यानंतर संदीप देशपांडे यांनी लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी केली आहे. सध्या मंत्रालय, महापालिका व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे. त्याचा परिणाम मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. अनेकांचे रोजगार बुडाले आहेत. तर, चाकरमान्यांना कार्यालये गाठण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

  लसीकरण कसे होणार ही चिंता
  या पार्श्वभूमीवर मनसेची मागणी नागरीकांचा मनस्ताप वाढवणारी ठरणार आहे. कारण राज्यात लसीकरण ठप्प झाले आहे. सरकारच्या जागतिक निविदेला प्रतिसाद मिळत नाही आणि केंद्र सरकारकडून लसी पुरवल्या जात नाहीत त्यामुळे सामान्यांना लसीकरण कसे होणार ही चिंता आहे, त्यात लसी शिवाय प्रवेश दिला जाणार नसेल तर त्यांच्या अडचणीत भर पडणार आहे.