मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी; अभियंत्यांचे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले

नगरसेवकांना मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आज म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.

    मुंबई : नगरसेवकांना मारहाण आणि शिवीगाळ करणाऱ्या नगरसेवकांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी आज म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने पालिका आयुक्त इकबाल चहल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली.

    भाजपाचे नगरसेवक हरीश भडिर्गे आणि नगरसेवक किरण लांडगे यांनी पाणी प्रश्नावर पालिकेच्या जलाभियंता विभागातील सहाय्यक अभियंता नितीन कुलकर्णी यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण केली.

    याप्रकरणी असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. सुखदेव काशीद यांच्या नेतृत्वाखाली अभियंत्यांच्या शिष्ठमंडळाने आज पालिका आयुक्तांची भेट घेतली. आणि त्या दोन नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी केली.  म्युनिसिपल इंजिनिअर्स असोसिएशनने अभियंत्यांच्या आंदोलनाला काल पाठिंबा दिला होता.