एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा! महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांची मागणी

मागील काही वर्षांपासून एसटी ताेट्यात सुरु आहे त्यातच गेल्या दिड वर्षात काेराेना काळात व निर्बंधामुळे एसटीची वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले. परिणामी, गतवर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघ झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य सरकारकडे मदत निधी मागितला. त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजूुर केल्याने गेल्यावर्षी व यंदा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले.

  मुंबई : धुळे विभागातील साक्री आगारातील एसटी चालक कमलेश बेडसे यांनी शुक्रवारी आत्महत्या केली. एसटी महामंडळातील अनियमित असलेले पगार,घर खर्च चालविण्यासाठी येत असलेल्या अडचणी,कर्जाचे ओझे, तणाव यामुळे आत्महत्या केली असल्याचे समाेर येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन नसल्याने कर्मचारी तणावात असल्याने आत्महत्येची वेळ येत असल्याचा आराेप कर्मचारी संघटनेने केला आहे. यावर कायमस्वरुपी ताेडगा काढण्याकरीता एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेसचे अध्यक्ष व अामदार भाई जगताप यांनी केली आहे.

  मागील काही वर्षांपासून एसटी ताेट्यात सुरु आहे त्यातच गेल्या दिड वर्षात काेराेना काळात व निर्बंधामुळे एसटीची वाहतूक बंद असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न घटले. परिणामी, गतवर्षांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही अवघ झाले आहे. एसटीला दैनंदिन खर्चासाठी पैसा अपुरा पडू लागल्याने महामंडळाने राज्य सरकारकडे मदत निधी मागितला. त्यानुसार राज्य सरकारने निधी मंजूुर केल्याने गेल्यावर्षी व यंदा कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आले.

  दरम्यानच्या काळात काेराेनाची दुसरी लाट सुरु झाली, मे नंतर दुसऱ्या लाटेचे रुग्ण कमी हाेत असल्यामुळे, महामंडळाने जूनच्या पहिल्या आठवड्यात राज्याच्या कानाकाेपऱ्यात एसटी पुन्हा सुरु केली. पण दुसऱ्या लाटेच्या भितीमुळे प्रवाशांची संख्या मात्र राेडावली ज्यामुळे उत्पन्न वाढले नाही. काेराेना पूर्वी एसटी महामंडळाचे दर दिवसाचे उत्पन्न २२ काेटी हाेते. दुसऱ्या लाटेनंतर एसटी पुन्हा सुरु केल्यानंतर उत्पन्नात वाढ झाली नाही.

  सध्या दरदिवशी केवळ ६ ते ७ काेटी उत्पन्न हाेत असल्याचे अधिकारी सांगतात. यामुळे आता जुलै महिन्यापासून पुढे वेतन व अन्य खर्चासाठी एसटी महामंडळाच्या तिजाेरीत पैसा शिल्लक राहिला नसल्याचे अधिकारी खासगीत सांगतात. ज्यामुळे ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यातील एसटीच्या ९७ हजार कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन अद्याप झालेले नाही, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

  अजून किती आत्महत्येची वाट पाहणार आहाेत? – भाई जगताप

  याबाबत महाराष्ट्र एसटी कर्मचारी काॅंग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप म्हणाले कि , काही दिवसांपूर्वी देखील एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली हाेती कमलेश बेडसे यांनी देखील कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या केली आहे. आणखी किती आत्महत्याची वाट पाहणार आहाेत? याशिवाय काेविडमुळे आतापर्यंत ३०४ एसट कर्मचाऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. आर्थिक अडचणीत असल्याने वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाहीत. तसेच महामंडळाची प्रवाशी उत्पन्न परिस्थिती पाहता भविष्यात फार उत्पन्न होईल असे वाटत नाही. त्यामुळे एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे