hindi board

दरवर्षी राज्य शासनाकडून(state government) १ जानेवारी ते १५ जानेवारी मराठी भाषा(marathi language) पंधरवडा साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे राज्य शासन १४ ते २८ जानेवारी साजरा करत आहे.

मुंबई : दरवर्षी राज्य शासनाकडून(state government) १ जानेवारी ते १५ जानेवारी मराठी भाषा(marathi language) पंधरवडा साजरा केला जातो. यंदा कोरोनामुळे राज्य शासन १४ ते २८ जानेवारी साजरा करत आहे. यानिमित्ताने मी मराठी व महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या विभागातील कार्यकर्त्यांनी विविध बँकांच्या शाखांमध्ये जाऊन बँक प्रशासनाला व रेल्वे स्थानक प्रमुखांना भेटून मराठी भाषेच्या वापराची तक्रार आणि निवेदन देत आठवण करून दिली.

ज्याठिकाणी फक्त इंग्रजी आणि हिंदीमध्ये सूचना व माहिती फलकांवर दिली आहे, तिथे ‘इथे मराठीत हवे’ असा स्टिकर लावून निषेध व्यक्त केला. याच काळात मराठी भाषा प्रेमी लोक संघटनेने तयार केलेला स्टिकर शर्टच्या खिशाला लावून मराठी भाषेवरील प्रेम व्यक्त करत आहेत.गेल्या सहा वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्र संरक्षण संघटना आणि मी मराठी एकीकरण समिती मराठी भाषा जतन व संवर्धनाचे काम करत आहे. संघटना विविध केंद्रीय, शासकीय, पालिका, खाजगी आस्थापनांना भेटी देऊन मराठी भाषेच्या वापराच्या संदर्भात चर्चा, निवेदन, तक्रारी करून जनजागृती करत असते, असे संघटनेकडून सांगण्यात आले.