मुंबई पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे,शिक्षण समितीत होणार निर्णय

आजची मुले उद्याचे भावी चालक असतील ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यात वाहतुकीचे नियम आतापासून रुजावे यासाठी मुंबई पालिका(BMC School) शाळांतील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण(Training Of Traffic Rules) देण्यात यावे अशी पत्राद्वारे केलेली मागणी शिक्षण समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.

    मुंबई : मुंबईत(Mumbai) दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या व वाहतुकीच्या नियमांकडे(Traffic Rules) करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे(Accidents) प्रमाणही वाढते आहे. शाळेतील लहान मुलांनाही सायकलीवरून किंवा पालकांसोबत, काही वेळा एकट्यानेच वाहतुकीच्या वर्दळीतून चालत जावे लागते. आजची मुले उद्याचे भावी चालक असतील ही बाब लक्षात घेऊन त्यांच्यात वाहतुकीचे नियम आतापासून रुजावे यासाठी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांचे प्रशिक्षण(Training Of Traffic Rules) देण्यात यावे अशी पत्राद्वारे केलेली मागणी शिक्षण समितीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहे.

    मुंबईच्या रस्त्यावर वाहनांच्या वाढलेल्या वर्दळीतून पालिका शाळांतील अनेक विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो. पदपथ अतिक्रमित झाल्याने त्यांना रस्त्यावरून वाहानांच्या वर्दळीतून चालावे लागते. अशा वेळी भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनामुळे रस्त्यावर चालताना, रस्ता ओलांडतानाही गोंधळामुळे अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. अनेक वाहन चालक नियम धाब्यावर बसवून वाहन चालवत असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आजची मुले उद्याचे भावी चालक असतील ही बाब लक्षात घेऊन त्यांच्या मनात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करू नये, अतिवेगाने वाहन चालवू नये, सिग्नलचा योग्यप्रकारे वापर करावा, सिग्नल तोडू नये, वाहन परवाना, पार्किंग, प्रवेश बंद, एकेरी वाहतूक आदी नियम पाळणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. वाहतुकीचे सर्व नियमांचे प्रशिक्षण पालिका शाळांतील मुलांना देण्यात यावे, अशी मागणी शिक्षण समिती सदस्या सईदा खान यांनी शिक्षण समितीकडे केली आहे. याबाबत येत्या समितीत निर्णय घेतला जाणार आहे.