देवनार हिंदू स्मशानभूमीचे पीएनजी गॅस शवदाहिनीमध्ये होणार रुपांतर; ८ कोटी रुपये येणार खर्च

प्रेतांचे दहन केल्याने येथील वसाहतीत धूर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या स्मशानभूमीचे पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करावे अशी मागणी येथील स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे मागील तीन वर्षापासून सातत्याने करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालिकेने येथील स्मशानभूमीची दुरुस्ती व पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

    मुंबई: मानखुर्द -शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या हिंदु स्मशानभूमीत दहन करण्यात येणाऱ्या प्रेतांचा धूर परिसरात पसरत असल्याने रहिवाशी त्रस्त होते. ही समस्या आता दूर होणार असून या स्मशानभूमीचे आता पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी ८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.

    प्रभाग क्रमांक १४३ मधील हिंदुस्मशानभूमी ही मानखुर्द- शिवाजी नगर विभागासाठी एकमेव आहे. एम पूर्व विभागात सुमारे १० लाख लोकसंख्येसाठी ही एकच स्मशानभूमी असल्याने येथील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रेतांचे दहन केल्याने येथील वसाहतीत धूर पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे या स्मशानभूमीचे पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करावे अशी मागणी येथील स्थानिक नगरसेवक विठ्ठल लोकरे मागील तीन वर्षापासून सातत्याने करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. पालिकेने येथील स्मशानभूमीची दुरुस्ती व पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाच्या निविदा काढण्यात आल्या असून त्यासाठी पालिका ८ कोटी २१ लाख रुपये खर्च करणार आहे.

    चेंबूरच्या एम पूर्व विभागात १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२ हे प्रभाग आहेत. सुमारे १० लाखांवर लोकसंख्या असताना येथे एकच हिंदुस्मशानभूमी आहे. मागील अनेक वर्षापासून येथे प्रेतांवर दहन केले जात असल्याने येथील रहिवाशांना धुराच्या त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे या स्मशानभूमीचे पीएनजी गॅस शवदाहिनीत रुपांतर करण्याबाबतची मागणी केली जात होती. सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे या स्मशानभूमीचे गॅस शवदाहिनीत रुपांतर करण्यात आले असल्याची नगरसेवक विट्ठल लोकरे यांनी सांगितले.