टॅब खरेदी करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करा; शिक्षक परिषदेची पालिका आयुक्तांकडे मागणी

प्रशासनाने दिलेल्या टॅबची किंमत रु. ७,५००; नंतर त्याच टॅबची किंमत रु. १०५०० दाखवून खरेदी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आँनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्याना जेव्हा गरज होती. तेव्हाच हे उपलब्ध होऊ शकले नाहीत.

    मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर पालिकेकडून (the Mumbai Municipal Corporation) ४० कोटींचे टॅब खरेदी (buying tabs) करण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर (the students ‘bank accounts) रक्कम जमा करावी (Be Deposite Money) अशी मागणी शिक्षक परिषदेने मुंबई महापालिका आयुक्त (Mumbai Municipal Commissioner) इकबाल सिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांच्याकडे केली आहे. मार्च-२०२० पासून आजपर्यंत शाळा बंद असून या काळात विद्यार्थ्यांना टॅबची आवश्यकता होती. पण यापूर्वी खरेदी केलेले टॅब हलक्या दर्जाचे होते.

    मुलांना लाॅकडाऊन काळात टॅब उपयोगात आलेले नाहीत. यापूर्वी २२ हजार टॅब खरेदी करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेले होते. हे टॅब हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे असून त्यामध्ये कुठलीही अपडेटची सुविधा नाही. तसेच काही धड्यांचा त्यात समावेश नाही. अशा कित्येक त्रुटी त्यात आहेत. त्या वेळोवेळी पुढे आल्या आणि वर्षभरातच तांत्रिक अडचणींमुळे उपयोग बंद होत गेला. सुरुवातीला या टॅबची किंमत रु. ७,५०० तर नंतर त्याच टॅबची किंमत रु. १०५०० दाखवून खरेदी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे आँनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्याना जेव्हा गरज होती. तेव्हाच हे उपलब्ध होऊ शकले नाहीत.
    आता निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय हा विद्यार्थी हिताचा नसून, त्यांची दुरुस्ती व देखभाल ही मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे टॅबची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी. शालेय पोषण आहाराची रक्कम ही विद्यार्थी खात्यावर जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने अगोदरच घेतला आहे.

    टॅब खरेदी थांबवण्यात यावी. टॅबचे पैसे विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार खात्यावर जमा करावेत.आणि दर महिन्याला इंटरनेट डाटा खरेदीसाठी ठराविक रक्कम विद्यार्थ्यांना मिळावी अशी मागणी शिक्षक परिषदेचे अध्यक्ष उल्हास वडोदकर आणि कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी पालिका आयुक्तांना केली आहे.