देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित केले जावू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीचा ‘सदभावना’ कायद्याचा प्रस्ताव : प्रकाश आंबेडकर

सध्याच्या सरकारचे सर्व आघाडयावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. आता आम्ही सजलो आहोत कि मुस्लीम आणि इतर धार्मिक समूहांच्या भावना उचकवण्यासाठी भावनिक आणि धार्मिक डावपेच वापरले जातील. आत्ता काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला जाईल, पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद स.अ. आणि इतर धार्मिक गुरु अथवा व्यक्तीमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरून समाजाला चिथावले जाईल व देशात दंगलीचे वातावरण तयार केल जाईल असे आमचे मत आहे.

  मुंबई : देशात सध्याच्या परिस्थिती संदर्भाने विचार केल्यास देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित करण्याचे काम केले जावू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीने सदभावना कायम रहावी यासाठी कायद्याचा प्रस्ताव मांडला आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या संसद आणि राज्य विधानसभेच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, याची दक्षता घेण्याची जबाबदारी असेल असे आवाहन प्रकाश आंबेडकर यानी केले आहे.

  बॉंबब्लास्ट आणि मॉब लीन्चींग सारखी कृत्य
  मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, स्वातंत्र्योतर काळात भारतीय समाज लहान मोठ्या अश्या बऱ्याच जातीय दंगलींचा साक्षीदार राहिला आहे, ज्या मध्ये अनेक माणसांचे बळी गेले. हिंदू, मुस्लीम, शीख, पारशी व बौद्धांना जागरूकता आल्याने अनेक जीव घेतलेल्या सांप्रदायिक दंग्यांमागील कार्यपद्धती आता जनतेला समजली आहे. मंदिर मस्जिद मध्ये मांस फेकणे, चिथावणीखोर आणि आक्षेपार्ह भाषा वापरून जमावाची माथी भडकावणे, खोटे आरोप करून एकमेकांवर हल्ले करवणे, अफवा पसरवणे या सगळ्या क्लुप्त्या दंगली घडवून आणणाऱ्या समाजविघातक संघटनाचेच कारस्थान असते हे आता समाजाच्या लक्षात आले आहे. जेंव्हा हि सगळी कारस्थाने अपयशी ठरतात तेंव्हा बॉंबब्लास्ट आणि मॉब लीन्चींग सारखी कृत्य केली जातात. त्याच प्रमाणे मुझफ्फरपुर येथे केलेला प्रयत्न देखील फसलेला आहे.

  देशात दंगलीचे वातावरण तयार केल जाईल
  सध्याच्या सरकारचे सर्व आघाडयावरील अपयश आता सर्वांसमोर आले आहे. आता आम्ही सजलो आहोत कि मुस्लीम आणि इतर धार्मिक समूहांच्या भावना उचकवण्यासाठी भावनिक आणि धार्मिक डावपेच वापरले जातील. आत्ता काही संघटनांकडून भावनिक व धार्मिक मुद्यांना हात घातला जाईल, पवित्र कुराण, पैगंबर मोहम्मद स.अ. आणि इतर धार्मिक गुरु अथवा व्यक्तीमत्वांच्या संदर्भाने निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरून समाजाला चिथावले जाईल व देशात दंगलीचे वातावरण तयार केल जाईल असे आमचे मत आहे.
   
  सदभावना कायद्याचा प्रस्ताव
  उपरोक्त परिस्थिती संदर्भाने विचार केल्यास देशात धार्मिक, सामजिक आणि वांशिक भावना कलुषित करण्याच काम केल जावू नये म्हणून आम्ही या कायद्याचा प्रस्ताव मांडत आहोत. येणाऱ्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या संसद व महाराष्ट्र विधानसभेच्या दोन्ही सदनांच्या अधिवेशनात हे विधेयक मांडले जाईल, याची दक्षता घेणे हि आमची जबाबदारी असेल असे आंबेडकर यानी म्हटले आहे.