ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य लीलाताई पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य लीलाताई बापूसाहेब पाटील यांच्या निधनाने संपूर्ण जीवन शिक्षण चळवळीला वाहून घेतलेले समर्पित व्यक्तिमत्व हरपले आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रासाठी आदरणीय लीलाताईंनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

               उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आदरणीय लीलाताईंनी शिक्षण क्षेत्रात सृजनात्मक प्रयोग केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी अनेक उपक्रम राबवले.
               सामाजिक सुधारणा आणि अस्पृश्यता निवारणासाठी दलितमित्र बापूसाहेब पाटील यांनी केलेल्या संघर्षाला आदरणीय लीलाताई यांची समर्थ साथ लाभली. शिक्षणाची बंदिस्त चौकट मोडून विद्यार्थ्यांना मोकळ्या वातावरणात शिक्षण मिळावे यासाठी लीलाताईंनी अनेक प्रयोग केले. त्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या. त्यांचे वडील आणि ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके साहेबांचा साहित्यिक वारसाही त्यांनी समर्थपणे पुढे नेला. महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आदरणीय लीलाताईंना  भावपूर्ण श्रद्धांजली.