राज्य विधीमंडळात २३१४९.७५ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या सादर, जाणून घ्या कुठे आणि किती रुपयांची असणार तरतूद

राज्य विधिमंडळात वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी २३१४९.७५ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या पटलावर मांडल्या.

  मुंबई : राज्य विधीमंडळात वित्त मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar) यांनी २३१४९.७५ कोटी रूपयांच्या पुरवणी मागण्या पटलावर मांडल्या. यापैकी ६८९५.४२ कोटीच्या अनिवार्य १२१९०.५१ कोटीच्या कार्यक्रमांतर्गत तर ४०६३.८१ कोटीच्या रकमा केंद्र पुरस्कृत अर्थसहाय्या करीता तरतूद करण्यात आली आहे.

  कुठे आणि किती असेल तरतूद ?

  या पुरवणी मागण्यांमध्ये कर्जाच्या परतफेडीकरीता ४९५९.७५ कोटी रूपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. त्या खालोखाल जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी ३८ ० ० कोटी रूपये ग्रामीण आरोग्य योजनेसाठी १८४१.०२ कोटी रूपये कोविड आजार सामुग्रीसाठी १४०२ .५१ कोटी रूपये समृद्धी महामार्गाच्या कर्जाच्या व्याजापोटी १२०० कोटी रूपये रस्ते विकासासाठी ११५० कोटी रूपये श्रावण बाळ योजनेसाठी सहाशे कोटी रूपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. त्याच बरोबर अंगणवाडी कर्माचा-यांसाठी चारशे कोटींची तरतुद प्रस्तावित करण्यात आली आहे.

  महात्मा फुले जन आरोग्य योजनेसाठी २७२ कोटी रूपये महात्माफुले कर्जमुक्ती योजने साठी १७५ कोटी, स्थानिक स्वराज्य संस्थासाठी २९३ कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

  हाफकिन संस्थेला लस निर्मितीसाठी ९४ .१६५ कोटी

  या मागण्यांमध्ये सर्वाधिक तरतूद ३६ ४ ४ कोटी रूपये सार्वजनिक आरोग्य विभागासाठी तर सर्वात कमी कृषी पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागासाठी रूपये ३०१ कोटी प्रस्तावित करण्यात आली आहे. यामध्ये हाफकिन संस्थेला लस निर्मितीसाठी ९४ .१६५ कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला ५० कोटी, सारथी संस्थेला ४५ कोटी, महात्मा फुले मंडळाला ३० कोटी रूपये अंशदान प्रस्तावित करण्यात आले आहे.