केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत : रुपाली चाकणकर

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्विट केले आहे. लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत, असे चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

    १०० कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयने शनिवारी छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे मुंबईपासून ते नागपूरपर्यंतच्या अनिल देशमुख यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली आहे. एकूण दहा ठिकाणी हे छापे मारले आहेत. मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगला आणि वरळीतील सुखदा इमारतीतील फ्लॅटवर सकाळीच सीबीआयने छाप मारले होते.

    सीबीआयने धाडच टाकली – जयंत पाटील

    सीबीआयने न्यायालयाकडून प्राथमिक चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग धाड घालण्यासाठी करत आहे. या माध्यमातून सीबीआय अनिल देशमुख यांची बदनामी करून राजकीय उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’ करण्याचे आदेश दिलेले होते