पवारांचा महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असूनही राष्ट्रवादी पंढरपूर जिंकू शकली नाही; निलेश राणेंची टीका

पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यालमुळे ममता बॅनर्जी बंगालमध्ये जिंकल्या असं काही जण म्हणतायत. पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची १ सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला आहे.

    मुंबई : पश्चिम बंगालमध्ये २०० चा आकडा पार करू पाहणाऱ्या भाजपला ममता बॅनर्जी नावाच्या वादळाने एकहाती रोखलं होतं .एकटी वाघिण मोदी-शहांना नडली अशा आशयाच्या चर्चा संपुर्ण देशात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांचे एक वक्तव्य सध्या प्रचंड चर्चेत आलं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या विजयमागे शरद पवार यांचा अदृश्य हात आहे,असं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांच्या एका वक्तव्याचा हवाला देत केले आहे. आव्हाडांच्या या वक्तव्याचा समाचार भाजप नेते निलेश राणे यांनी घेतला आहे.

    निलेश राणे काय म्हणाले ?

    निलेश राणे यांनी ट्वि करत असं म्हटलं आहे की, पवार साहेबांचे अदृश्य हात असल्यालमुळे ममता बॅनर्जी बंगालमध्ये जिंकल्या असं काही जण म्हणतायत. पण पवार साहेबांचे महाराष्ट्रात प्रत्यक्ष हात असून सुद्धा पंढरपूरची १ सीट राष्ट्रवादी जिंकू शकली नाही, असे म्हणत निलेश राणे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला आहे.

    जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते ?

    जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केले होती की ,नप.बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..!न“शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.”नयाचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..! त्यामुळे बंगालच्या विजयामध्ये ममतादिदिंसोबत शरद पवारांचा ही वाटा आहे असा अर्थ सध्या आव्हाडांनी काढला आहे