नामांतराआधी शहरांचा विकास करा; काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंनीही शिवसेनेला घेरले

नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांचं महत्वाचं विधान केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. याला देखील टोपेंनी प्रत्युत्तर दिले आहे. "औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा", असं राजेश टोपे म्हणाले.

मुंबई : राज्यात सध्या शहरांच्या नामांतरणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेला वाद चांगलाच पेटला आहे. औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं करण्यास महाविकास आघाडीत मतभेद आहेत. काँग्रेसने याला विरोध केला असताना राष्ट्रवादीचे नेते तथा आरोग्य मंत्री राजेश टोपेंनीही शिवसेनेला घेरले आहे.

नामांतराच्या मुद्द्यावर राजेश टोपे यांचं महत्वाचं विधान केले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसच्या सेक्युलरवादावर जोरदार टीका केली. याला देखील टोपेंनी प्रत्युत्तर दिले आहे. “औरंगाबादला संभाजीनगर म्हणा किंवा उस्मानाबादला धाराशिव म्हणा पण विकास करा”, असं राजेश टोपे म्हणाले.

महाविकास आघाडी ही किमान समान कार्यक्रमावर एकत्र आली आहे. तिन्ही पक्षाच्या समन्वय समितीनं याबाबतचा निर्णय घेतला तर कोणतीही अडचण येणार नाही. मुळात नामांतराआधी त्या शहरातील जनतेची इच्छा समजून घेतली पाहिजे, असं राजेश टोपे म्हणाले.