मॅनकाइंड फार्मा तर्फे मधुमेहावरील नावीन्यपूर्ण औषधाची निर्मिती; रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात हे औषध कमालीचे प्रभावी सिद्ध होणार

एमकेपी१०२४१ हा गुणकारी आणि तोंडावाटे दिला जाणारा छोटा रेणू आहे, तो जीपीआर११९ प्रचालक (अगोनिस्ट) आहे. जीपीआर११९ स्वादुपिंडांच्या बिटा पेशींमध्ये तसेच आतड्यातील एण्टेरोएण्डोक्राइन पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

    मुंबई : मॅनकाइंड फार्मा या भारतातील ४थ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या औषधनिर्माण कंपनीने आपले पाहिले नावीन्यपूर्ण संशोधन करून निर्मित करण्यात आलेल्या औषधिकरिता भारतीय औषध नियामक प्राधिकरण, केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था यांच्याकडे मंजुरीसाठी अर्ज सादर केला आहे. मधुमेही रुग्णांना या औषधामुळे दिलासा मिळणार असून एमकेपी १०२४१ या पेटंटेड पहिल्या नोव्हेल प्रतिजैविक रेणूसाठी हा अर्ज सादर करण्यात आला आहे.

    मधुमेहरोधक रेणूंचा हा नवीन वर्ग विकसित करण्यासाठी अविश्रांत संशोधन केले आहे. या रेणूचे डिझाइन आणि विकास मॅनकाइंड रिसर्च सेंटरमध्ये करण्यात आले आहे. अशी माहिती मॅनकाइंड फार्माचे कार्यकारी अध्यक्ष आरसी जुनेजा यांनी दिली.

    जुनेजा पुढे म्हणाले की, एमकेपी१०२४१ हा गुणकारी आणि तोंडावाटे दिला जाणारा छोटा रेणू आहे, तो जीपीआर११९ प्रचालक (अगोनिस्ट) आहे. जीपीआर११९ स्वादुपिंडांच्या बिटा पेशींमध्ये तसेच आतड्यातील एण्टेरोएण्डोक्राइन पेशींमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो.

    सीडीएससीओद्वारे मंजुरी मिळून हे अशा प्रकारचे पहिलेच औषध बाजारात आल्यानंतर मधुमेहाच्या रुग्णांना खूप लाभ होईल, असे कंपनीला खात्रीने वाटत आहे. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात हे औषध कमालीचे प्रभावी सिद्ध होईल, अशी कंपनीला खात्री आहे असा दावा जुनेजा यांनी केला.