प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्य सरकारच्या महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी मेट्रो ३ विरोधातील शुक्लकाष्ट संपत नाही आहे. दक्षिण मुंबईत जमिनीखाली सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस हा आवाज ९० डेसीबल पेक्षा वाढत असल्याने ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • प्रतिवाद्यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश

मुंबई (Mumbai).  राज्य सरकारच्या महत्वपूर्ण प्रकल्पांपैकी मेट्रो ३ विरोधातील शुक्लकाष्ट संपत नाही आहे. दक्षिण मुंबईत जमिनीखाली सुरू असलेल्या मेट्रोच्या कामामुळे विशेषतः रात्रीच्या वेळेस हा आवाज ९० डेसीबल पेक्षा वाढत असल्याने ध्वनीप्रदूषणात वाढ होत असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली आहे.

ध्वनी प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने डिसेंबर २०१७ पासून मेट्रो ३ च्या रात्री १० ते ६ कामावर बंदी घातल्याममुळे कामाची डेडलाईन हुकण्याची शक्यता लक्षात घेता मेट्रो प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसे असतानाही रात्री मेट्रोचे खोदकाम सुरू असल्याने न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचा आरोप करत दक्षिण मुंबईतील स्थानिक रहिवासी रॉबीन जयसिंघानी यांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. मेट्रोच्या रात्रीच्या कामामुळे होणाऱ्या आवाजासमोर झोपणे अशक्य झाले आहे.

आवाजाचा दुष्परिणाम हा मुलांच्या अभ्यासावरही झाल्याचा दावा जयसिंघानी यांनी केला आहे. दुसरीकडे, मेट्रो संदर्भातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन यंत्रणा उपलब्ध केली जाईल, असी ग्वाही मेट्रोकडून देण्यात आली होती. मात्र, अशी कोणतीही यंत्रणा मेट्रोने उपलब्ध करून दिली नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्याची दखल घेत मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने एमएमआरसीएल, एल अँड टी कंपनीसह सर्व प्रतिवाद्यांना दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली.