निसर्ग चक्रीवादळाने नुकसान झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या – फडणवीस

मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषत: कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, छोटे दुकानदार, मूर्तिकार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या

 मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यात विशेषत: कोकणातील जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी, मासेमार, फलोत्पादक, छोटे दुकानदार, मूर्तिकार यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेल्याने घरांचे आणि घरातील सामुग्रींचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने सर्वत्र तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. पुणे, नाशिक, मालेगाव या भागात सुद्धा मोठे नुकसान झाले आहे. शेतमाल खरेदी होत नसल्याने आधीच शेतकरी त्रस्त आहे. आता प्रत्यक्ष हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे तातडीने नुकसानभरपाई द्यावी, ही राज्य सरकारला विनंती!