आज गोपीनाथ मुंडे असते तर सरकारची ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांनी जागवल्या लोकनेत्याच्या आठवणी

मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadanvis) यांनी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

  मुंबई: गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde)यांनी केंद्रीय राजकारणातही आपली चमक दाखवली. म्हणूनच पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्याकडे त्यांचे ग्रामविकास हे त्यांचे आवडीचे खाते त्यांना देण्यात आले. मात्र नियतीला वेगळेच काही मान्य होते. मुंडे साहेब आज आपल्यात नाहीत. पण त्यांचे विचार, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra  Fadanvis) यांनी गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांना श्रद्धांजली अर्पण केली.

  डाक पाकीट केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार
  फडणवीस म्हणाले की, आज लोकनेते गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत या सरकारची झाली नसती, आमच्या नेत्याचे डाक पाकीट प्रसिद्ध केल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार त्यांनी मानले आणि गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली. भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीट अनावरण करण्यात आले. यावेळी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते ऑनलाईन माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले. या कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी जागवल्या.

  सत्तेसोबत समझोता करून नेता बनत नाही
  काही लोक सामान्य म्हणून जन्माला येतात. पण ते कार्याने असामान्य ठरतात असे सांगत फडणवीस म्हणाले की, गोपीनाथ मुंडे हे त्यापैकीच एक होते. ते जननायक आणि लोकनायक बनले. छोट्या गावातून येऊन त्यांनी महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला. फडणवीस म्हणाले की, मुंडेंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेता बनवले. त्यांच्यासोबत राज्यात आणि विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. ते नेहमी सांगायचे की सत्तेसोबत कधी समझोता केलात तर कधीही नेता बनू शकत नाही. सत्तेसोबत संघर्ष केलात तर तुम्ही नेता बनू शकता. सत्तेसोबत संघर्ष करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, अशा शब्दात फडणवीसांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.

  फास्ट फूडची क्रेज कमी करण्यासाठी आता पालकांनीच पौष्टिक आहाराचा आग्रह धरायला हवा तरच येणारी पिढी सशक्त असेल, असे वाटते का?

  View Results

  Loading ... Loading ...

  मुंडेना पाहून लोकांना विश्वास वाटायचा
  गोपीनाथ मुंडे यांनी मोठा काळ विरोधी पक्षात घालवला. पुढे युतीची सत्ता आली त्यात ते उपमुख्यमंत्री, गृहमंत्री बनले. त्या काळात ज्या मुंबईत अंडरवर्ल्डची दहशत त्यांनी संपवली. गृहमंत्री म्हणून त्यांनी चांगले काम केले. सोबतच ते शेतकऱ्यांचे नेते होते. विधानसभेत ज्या प्रमाणे गोपीनाथ मुंडे यांना ऐकण्यासाठी सर्व सदस्यांचे कान आसुसलेले असायचे. त्या प्रमाणे संपूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यात मुंडेसाहेबांना पाहायला, ऐकायला लोक यायचे. गोपीनाथ मुंडे सत्तेत असोत वा नसोत, त्यांचा एक रुबाब कायम होता. मुंडे यांना पाहून लोकांना आपले प्रश्न आता सुटतील असा विश्वास वाटायचा, असेही फडणवीस म्हणाले.