माध्यमांची मुस्कटदाबी होतेय – देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांकडे मांडले गाऱ्हाणे

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण

 मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी राज्यात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करून पत्रकार संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे, असं गाऱ्हाणं मांडलं. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल कोश्यारी यांना एक निवेदन दिलं. यामध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांना गृहमंत्र्यांनी स्वत: पत्र लिहून एफआयआर दाखल करण्याची आणि चौकशी करण्याची धमकी दिली. या सरकारच्या काळात लोकशाहीच्या चौथ्या स्तभांची मुस्कटदाबी होतीये, असा आरोप त्यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर यावेळी भाजप नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते विनोद तावडे, आशिष शेलार, मुंबई भाजपाध्यक्ष मंगरप्रभात लोढा हे यावेळी उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजपतर्फे राज्यपालांना निवेदन दिलं. दुसरीकडे एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्यावर बांद्रा गर्दीचा ठपका ठेवत त्यांना तातडीने उस्मानाबाद येथून मुंबईला आणण्यात आले. या काळात त्यांचा अनेक हॉटस्पॉट भागातून प्रवास झाला. राज्य सरकार सूडाने वागत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.